Ad will apear here
Next
भिडे कार्यशाळेत ‘पाणी वाचवा’ संदेश देत रंगोत्सव साजरा


रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेमध्ये दर वर्षी शिमगोत्सव आणि रंगोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जातो. या वर्षीही ‘पाणी वाचवा’ असा संदेश देत रंगपंचमी साजरी करण्यात आली.

विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या सहभागाने पालखी सजावट, ढोल-ताशाचा गजरात पालखीची मिरवणूक, पालखी नृत्य पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आले. या वर्षी विद्यार्थ्यांनी शिमग्यात खेळे, संकासूर, गोमुचा नाच आणि नमन सादर करत फाकाही घातल्या. या माध्यमातून खेळ्यांची लोप पावणारी संस्कृती जपण्याचा संदेश दिला.



रंगपंचमीच्या दिवशी कोरड्या रंगांची उधळत करत पाण्याची बचत करण्यात आली. या शिमगोत्सवाच्या निमित्ताने या विशेष मुलांमधील रंगांची भीती दूत करत कार्यक्रमांत सहभागी होऊन आनंद व्यक्त करणे, पर्यावरणपूरकता, पारंपरिकता जपणे आणि आत्मविश्वास वाढवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उद्देश सफल झाल्याचे भिडे कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZJFBY
Similar Posts
‘आविष्कार’च्या वस्तू एक नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध रत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आविष्कार संस्थेच्या श्री. शामराव भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, आकाशकंदील आदी वस्तूंची स्टॉलच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जी येथे, तर एक ते चार नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत रत्नागिरी शहरातील स्वा
श्यामराव भिडे कार्यशाळेत दिव्यांग दिन उत्साहात रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘क्षण रंगलेले’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.
भिडे कार्यशाळेत हर्षयामिनी निवास प्रकल्पाचे आयोजन रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत हर्षयामिनी हा निवास प्रकल्प राबविण्यात आला. यात ‘जादू की दुनिया मॅजिका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जादूगार विनयराज उपरकर यांनी आपल्या जादुई कौशल्याने कार्यशाळेचे विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांवर जादू केली. विद्यार्थ्यांनी चांदण्या रात्री सहभोजनाचा आस्वाद घेतला
गणेशगुळ्यात शिमगोत्सवाची सांगता रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथील ग्रामदैवत श्री देव आदित्यनाथाच्या शिमगोत्सवाची रंगपंचमीला रूपं उतरल्यानंतर उत्साहात सांगता झाली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language